मोहाडी येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय जळगाव येथे ११० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजनाच्या शस्रक्रिया यशस्वी.

मोहाडी येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालय जळगाव येथे ११० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजनाच्या शस्रक्रिया यशस्वी.  जिल्हा महिला व बाल रुग्णालय (मोहाडी) येथे नुकतेच दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरमध्ये ११० रुग्णांच्या कुटुंब नियोजनाच्या अत्यंत जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या. या शस्रक्रिया डॉ. बेलसोडे व चमुने यशस्वीरित्या पूर्ण केली. वैद्यकीय अधीक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णालय डॉ. किरण सोनवणे यांच्या सहकार्याने या सर्व शस्त्रक्रिया पार पडल्या. यात नॉर्मल डिलिव्हरी चे ४१, पहिल्या सिजेरियन सेक्शन चे १६, दुसऱ्या सिजेरियन सेक्शनचे ५३ अशा अत्यंत गुंतागुंतीच्या व जोखमीच्या शस्त्रक्रियांचा सामावेश होता.

रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. गुरुप्रसाद वाघ, डॉ. रूपाली कळसकर, डॉ. मीना दामोदरे व सहायक अधिसेविका संगीता शिंगारे, शस्त्रक्रिया विभाग प्रमुख, कदक्ष प्रमुख, अधिपरिचारिका, कक्ष सेवक व इतर स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धापटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग पवार यांच्या सहकार्याने संपूर्ण शिबिर यशस्वीपणे पार पाडले. हे सर्व शिबिर विनामूल्य घेण्यात आले व तब्बल ११० रुग्णांनी दुर्बिणीद्वारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा लाभ घेतला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.