प्रधानमंत्रींच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे निधी वितरण.

प्रधानमंत्रींच्या हस्ते २४ फेब्रुवारी रोजी किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे निधी वितरण.  पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ कालावधीतील १९ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०२.१५ वा. ते ०२.३० वा. या कालावधीत भागलपुर, बिहार येथील समारंभात वितरीत होणार आहेत. हा कार्यक्रम देशामध्ये “किसान सन्मान समारोह” म्हणून सर्वदूर आयोजित करण्यात आलेला आहे.

पी एम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थीने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्यस्थितीत या तीनही बाबीची पूर्तता केलेल्या एकूण ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना दिनांक २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुमारे रक्कम रुपये १९६७ कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
राज्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर सदरचा समारोह आयोजित करण्यात येत आहे. समारंभाच्या वेळी प्रगतशील शेतकरी कृषि शास्त्रज्ञ, निमंत्रित मान्यवर, तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, प्रदर्शने, विविध योजनांची माहिती व लाभ वितरण इ. कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात वेगाने सुरु असलेल्या अग्रोस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी माहिती संच तथा फार्मर आयडी बनविण्यासाठीची नोंदणी नागरी सुविधा केंद्रांवरुन करण्यात येत आहे. या ठिकाणावरुनही या समारोहाचे थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.
मुख्यमंत्री, व कृषी मंत्री या समारोहास सातारा येथून सहभागी होणार आहेत. राज्यांमध्ये सर्वदूर कृषि विभाग, महसूल व वने विभाग, ग्राम विकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा समारोह साजरा करण्यात येणार आहे. सदरच्या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे असे कृषी आयुक्तालयाकडून आवाहन करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.