भुसावळ येथील संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल येथे 22 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन.

भुसावळ येथील संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल येथे 22 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व प्रतिष्ठा महिला मंडळ भुसावळ आणि समर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 09.00 वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन संतोषी माता बहुउद्देशीय क्रीडा संकुल, प्रोफेसर कॉलनी, भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव येथे करण्यात आलेले आहे.नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असुन 10वी, 12 वी/ सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए./ एम.बी.ए तसेच सर्व डिग्री धारक पात्रता धारकासाठी 600 पेक्षा जास्त रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्हयातील जैन फॉर्म फ्रेश जळगाव, युवा शक्ती नाशिक, हिताची ॲस्टीमो ब्रेक.प्रा.लि.जळगाव, किरण मशिनटुल्स जळगाव, फ्युचर टेक्स जळगाव,टी.डब्लयु.जे, जळगाव, जैन इंरिकेशन प्रा.लि, मानराज मोटर्सजळगाव,गोविंदा एच.आर.नाशिक अशा आस्थापनांकडे नोकरीची संधी उपलब्ध आहे.
मेळाव्यात पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर लॉग-इन करुन रिक्तपदांना ॲल्पाय करावे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र व बायोडाटासह मेळाव्यास मुलाखतीच्या दिवशी हजर राहावे.
याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 09.45ते संध्या.06.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक 0257 – 2959790 वर संपर्क साधावा असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.