जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजुरी व हप्ता वितरण सोहळा.

जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत घरकुल मंजुरी व हप्ता वितरण सोहळा. जळगाव प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जळगाव जिल्ह्याकरिता मंजूर ८९,८६८ उद्दिष्टांपैकी ८४,४५४ लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.राज्यस्तरावर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील ८४,४५४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे.केंद्रीय मंत्री अमित शहा हे राज्यभरातील लाभार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील पहूर पेठ, देवगाव, साकरी, पाळधी, हातेड, दहिवद या ग्रामपंचायतींच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तसेच लाभार्थ्यांनी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.