कोयत्याने वार केला अन् प्रेयसीचे शीर धडावेगळं! स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतलं.

पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला, त्यानंतर चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वा केल्यानं प्रेयसीचे शीर धडावेगळं झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातून आलेल्या प्रेमीयुगुलापैकी प्रेयसीने पैसे मागितल्याच्या रागातून प्रियकराने कोयत्यानं वार केला, त्यानंतर तिचे शीर धडावेगळे झाले. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (दि. 19) ही घटना घडली आहे. सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी सखाराम धोंडिबा वालकोळी (वय 58, रा. निडगुरसर, ता. आंबेगाव, जि.  याने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेबाबत पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनालीसोबत बुधवारी  सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेले होते. यावेळी प्रेयसी सोनाली आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली. ‘मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन,’ असं ती म्हणात होती, त्यावरून सोनाली व सखाराम यांच्यात वाद झाला. त्यानंतर सखारामने सोनालीच्या मानेवर कोयत्यानं वार केला, यामध्ये तिचा मृत्यू झाला. कोयत्याचा वार इतका जोरात होता, त्यामुळे सोनालीचे शीर धडावेगळे झाले. त्यानंतर आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला. तेथे त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. ‘मी माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले  आहे,’ असं त्याने पोलिसांना सांगितलं.पोलिसांनी सोनालीचा मृतदेह पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वांबोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे वांबोरी परिसरात खळबळ उडाली. बाहेरगावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता? त्याने आपल्या प्रेयसीची हत्यानेमकी कोणत्या कारणावरून केली? फक्त पैशावरून वाद होता का? तो वांबोरीपर्यंत कोणत्या वाहनाने आला? याचा तपास पोलिस करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.