शिक्षकाने सहकारी शिक्षकाच्या पत्नीचाच केला विनयभंग! गोंदियातील शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना.

गोंदिया जिल्ह्याचा देवरी शहरातील एका विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.जिल्ह्याचा देवरी शहरातील एका विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिक्षक याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याविषयी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक 53/25 भारतीय न्याय संहिता 75 (2) 79 या कलमांतर्गत आरोपी शिक्षक याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

पुढे आलेल्या माहितीनुसार, सदर महिलाही अनुसूचित जातीचे असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलम वाढ करून ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहे.उपराजधानी नागपूर शहरातील मेट्रो, रेल्वे स्थानक, बस स्थानक, मार्केट परिसर आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेल्या दुचाकी चोरून त्या भंडाऱ्यात मॉडिफाय करून तुमसर तालुक्यात अत्यंत अल्प दरात विकणाऱ्या टोळीच्या नागपूर क्राइम ब्रांच नं फांडाफोड करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरीच्या 50 पेक्षा अधिक दुचाकींसह तिघांना नागपूर क्राइम ब्रांचनं तुमसर पोलिसांच्या मदतीनं भंडाऱ्याच्या तुमसरातून ताब्यात घेतलं आहे. नागपुरातून चोरी केलेल्या दुचाकी तुमसरात आणून एका मेकॅनिकलच्या माध्यमातून गाडीचा रंग, नंबर प्लेट बदलवून आणि चेसिसची खोडतोड करून बनावट नंबरवर ती वाहनं कमी किमतीत विकण्याचा गोरखधंदा या टोळीनं केला. तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथील आकाश खोब्रागडे (३२) हा या दुचाकी चोरीच्या टोळीचा मुख्य मोरक्या आहे. यासह अन्य दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नागपूर क्राइम ब्रांच नं चोरीच्या घटनेबाबत सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात आकाश हा आढळून आल्यानं मागील काही दिवसांपासून क्राइम ब्रांच त्याच्या मागावर होता. दरम्यान या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तवली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.