आरोपींस अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक.

 भिवंडी शहरात वऱ्हाळ नगर कामतघर या झोपडपट्टी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात आरोपींस अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून चक्क दगडफेक करण्यात आली आहे.भिवंडी शहरात वऱ्हाळ नगर कामतघर या झोपडपट्टी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात शेजारच्या मुलांच्या प्रेमप्रकरणातून संशय घेत शेजाऱ्याने केलेल्या भांडणात आई आणि अल्पवयीन मुलीस मारहाण करताना अल्पवयीन मुलीच्या वडीलांना मारहाण केली.

या वेळी घाबरून अल्पवयीन मुलीने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अल्पवयीन मुलीस उपचारासाठी आय जी एम रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिस ठाण्यास मिळताच पोलीस आयजीएम रुग्णालयात दाखल होऊन अल्पवयीन मुलीचा जबाब घेत असतानाच या गुन्ह्यातील आरोपी हे वऱ्हाळ नगर कामतघर येथे उभे असल्याचे समजले असता नारपोली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार व सुनील शिंदे व तडवी हे पथक पोलिस जीप घेऊन घटनास्थळी आरोपींना पकडण्यासाठी गेले.

या वेळी तेथील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी या पोलिसपथका सोबत अरेरावीची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा व आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने पोलिसांवर व पोलिस जीप वर दगडफेक करून हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, यामध्ये जीपचे नुकसान झाले असून तडवी हे पोलीस शिपाई दगड लागल्याने जखमी झाले आहेत. सध्या पोलीस शिपाई तडवी यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून नारपोली पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईकडून तसेच पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार यांच्या तक्रारीवरून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकारणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर पुढील तपास पोलीस करत आहे.एटीएम कार्डची अदलाबदल करून बँक खातेदाराच्या खात्यातून रोकड उडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे या टोळीतील दोन सदस्यांच्या मुस्क्या आवळुन रोख. कार आणि मोबाईल असा 6 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहना व्यंकट रमण चिंताला आणि कृष्ण भिमनळीकर अशी अटकेतील टोळी सदस्यांची नावे आहेत यांच्यावर  पर राज्यातही या टोळीवर डजनभर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.