मुंबईत फिल्म सिटीजवळ भीषण आग; अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी, अनेक झोपड्या जळून खाक.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव पूर्वेत भीषण आग लागलेली आहे. फिल्मसिटीच्या गेटजवळ असलेल्या संतोष नगर भागात आगडोंब उसळला आहे. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव पूर्वेत भीषण आग लागलेली आहे. फिल्मसिटीच्या गेटजवळ असलेल्या संतोष नगर भागात आगडोंब उसळला आहे. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या संतोष नगर परिसरात पोहोचल्या. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागण्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.फिल्मसिटीजवळ असलेल्या संतोष नगर परिसरात झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली. घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागल्यानं आग झपाट्यानं वाढत गेली. अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ‘अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. घटनास्थळी गरज लागल्यास एक रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे,’ अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.