सागवानाच्या लाकडाचा पंचनामा करून हॅमर मार्क (विशिष्ट खूण) करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणारा वनरक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पिंजऱ्यात अडकला सागवानाच्या लाकडाचा पंचनामा करून हॅमर मार्क (विशिष्ट खूण) करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणारा वनरक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. एसीबीच्या पथकाने लकडगंज परिसरात केलेल्या या कारवाईमुळे वनअधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.रमेश राम सोनुले (वय ४३) असे अटकेतील वनरक्षकाचे नाव आहे. तो लकडगंजमधील वनक्षेत्र साहाय्यक कार्यालयात कार्यरत आहे. कामठीतील ३० वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. ६ फेब्रुवारीला तक्रारदाराने घराचे दरवाजे बनविण्यासाठी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथून १५ नग सागवानाची लाकडे खरेदी केली. यासाठी वनविभागची परवानगीही घेतली.










