वर्गात वाद सुरु असताना झालेल्या मारामारीत एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या छातीत बुक्की मारली. यामुळे त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शाळेत एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी येथील जिल्हा शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.लेकाच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूने त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. मृत विद्यार्थ्याचे वडील गणेश जालान म्हणाले की, विद्यार्थी शिक्षकांसमोर कसे भांडू शकतात? शाळेत अभ्यास नाही होत का? माझी मागणी आहे की, माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीला शिक्षा व्हावी.










