गावाला जातो सांगून निघाला तो आलाच नाही, दोन दिवस बेपत्ता; नंतर तलावात मामा – भाच्याची बॉडी; काय घडलं?

सोलापुरात मामा – भाच्याचा मृतदेह तलावात तरंगताना दिसला आणि एकच हळबळ उडाली. लेक गावाला जातो सांगत निघाला तो परत आलाच नाही. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. दोघेही नात्याने मामा – भाचा असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी समोर आली आहे. गणेश अनिल सपाटे (वय २६, अलीपूर रोड बार्शी), शंकर उत्तम पटाडे (वय ४०, रा. यशवंत नगर, तुळजापूर रोड, बार्शी) अशी मृत तरुणांची नावं आहेत. मंगळवारपासून मामा – भाचे बेपत्ता होते. त्यानंतर बुधवारी तलावात दोघांचा मृतदेह तरंगत असताना आढळला. हा घातपात आहे का? की अपघात? या बाजूने बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कसून तपास करत आहेत.

गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रेय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा गणेश हा सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.गणेश सपाटेचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद होता. बार्शी तालुक्यात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत होता. १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी अनिल सपाटे यांना पांगरी पोलिसांचा फोन आला.पोलिसांनी माहिती देताना सांगितलं, की महागाव जवळील तलावातील पुलाजवळ दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याचं सांगितलं. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही तरुणांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या साहाय्याने बाहेर काढले. हाताला आलेल्या पोराचा मृतदेह पाहून वडिलांना जबरदस्त धक्का बसला. गणेश सपाटे आणि शंकर पटाडे हे दोघे मामा – भाचे आहेत ही माहिती पोलिसांसमोर आली. दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस पुढी तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.