खुन्नस दिली वाद पेटला अन पाचोऱ्यात २० वर्षीय तरुणाचा खून !

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता पाचोरा शहरात शुल्लक कारणाने २० वर्षीय तरुणाची चाकू मारून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यात हेमंत संजय सोनवणे (20, जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी संशयित रोहित गजानन लोणारी (20, शिव कॉलनी) यास अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवजयंती निमित्त मिरवणूक निघाली व मिरवणुकीनंतर हेमंत संजय सोनवणे (20) यास शहरातील बाहेरपुरा येथे रोहित गजानन लोणारी याने खुन्नसने का पाहतो म्हणून वाद घालत पोटात चाकू मारला व संशयीत पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हेमंत सोनवणे यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हेमंत सोनवणे हा गंभीर जखमी असल्याने त्यास सुरूवातील शहरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले व प्रथमोपचार करून लागलीच जळगाव सिव्हीलला उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रोहित लोणारी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रोहित लोणारीविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.