जळगावात उसनवारी पैशाचा वाद भोवला : तरुणावर धारदार विळ्याने वार.

उसनवारीने दिलेले पैसे मागण्यासाठी आलेल्या तरुणाने मित्राच्या कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने संतापाच्या भरात मोहीत सुनिल चौधरी (वय २४, रा. भादली, ता. जळगाव) या तरुणावर धारदार विळ्याने वार केले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील आयोध्या नगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात घडली. वार करणारा संशयित धीरज प्रल्हाद पाटील (वय २३, रा. हनुमान नगर) हा स्वतःहून पोलिस स्टेशनला जमा झाला आहे.सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील भादली येथे राहणारा मोहीत सुनिल चौधरी हा एमायडीसीतील एका कंपनीत कामाला आहे. त्याच कंपनीत धीरज पाटील हा देखील कामाला असून दोघांची चांगली मैत्री होती. काही दिवसांपुर्वी धिरजने मोहीतकडून पाच हजार रुपये उसनवारीने घेतले होते, तर त्यापैकी चार हजार रुपये त्याने परत दिले होते. उर्वरीत एक हजार रुपयांसाठी मोहीतने धीरजकडे तगादा लावला होता. मंगळवार दि. १९ रोजी दुपारच्या सुमारास मोहीतने धीरजला पैशांसाठी फोन केला असता, धीरजने पैसे घेण्यासाठी मोहीतला पैसे घेण्यासाठी घरी बोलावले.

मंगळवारी दुपारी मोहीत हा पैसे घेण्यासाठी अयोध्या नगरातील हनुमान नगरात धीरजच्या घरी गेला. त्याठिकाणी मोहीतने धिरजच्या कानशिलात लगावली. त्यानंतर धीरज हा घरात गेला असता, त्याठिकाणी देखील मोहीतने धीरजच्या कानशिलात लगावून पैशांसाठी तगादा लावला. त्यावेळी संतापलेल्या धिरजने घरात पडलेला धारदार विळ्याने मोहीतवर वार केले. यामध्ये मोहीतच्या पोटाला दुखापत होवून तो गंभीर जखमी झाला.संतापाच्याभरात घाबरलेल्या धिरजने घराला बाहेरुन कुलूप लावून तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतः हजर होवून पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस त्याला सोबत घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी मोहीतला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. संशयित धीरज प्रल्हाद पाटील याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.