जळगावात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई : बायोडिझेलच्या दोन टँकरवर कारवाई !

शहरातून अवैधपणे बायोझिडेलची वाहतुक करणाऱ्या दोन टँकवर एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर कारवाई करीत जप्त केले. या कारवाईत २७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात टँकर चालकांसह त्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अजिंठा चौफुली येथे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री २ वाजता गस्तीवर असताना अजिंठा चौफुली येथून संशयास्पदरित्या जाणारे दोन ट्रॅकर पोलिसांनी थांबवले. त्यावेळी चालकांची चौकशी केली असता दोघांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता दोन्ही ट्रॅकरमध्ये बायोडिझेल भरलेले आढळून आले. दरम्यान पोलिसांनी टँकर क्रमांक (जीजे १२ बीटी ११८१) आणि (जेजे १२ बीटी ४२८४) अशी दोन्ही वाहने हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले .पोलिसांनी आणलेल्या टँकरचा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करुन त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल असल्याचे उघडकीला आले.

याप्रकरणी पोलीस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक सद्दाम सय्यद अकबर (वय २३, रा. बच्छाव राज्य गुजरात) आणि लतीफ भाई फकीर मोहम्मद हिंगोरजा (वय २४, रा. आडेचार जि. कच्छ राज्य गुजरात यांच्यासह टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (वय २१, रा.उकडी ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास छेरेया (रा. वरसाना कच्छ राज्य गुजरात) या चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनगे हे करीत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.