एक हजाराची लाच भोवली ; खासगी इसमाला एसीबीने रंगेहात पकडले..

आजोबांच्या नावावर असलेला प्लॉटवर वारस लावण्यासह हक्कसोड आणि कर्जाच्या बोजाची नोंद करण्यासाठी, साहेबांकडून काम करुन देण्याच्या मोबदल्यात नगर भूमापन अधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसमाला एक हजाराची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी झाली, अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९) असे लाचखोर खासगी इसमाचे नाव असून या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेतक्रारदार यांच्या जळगाव शहरातील रहिवासी असलेले तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या प्लॉटवर वारस नोंदणी, हक्कसोड प्रक्रिया आणि कर्जाच्या नोंदीसाठी संबंधित नगर भू मापन अधिकारी कार्यालयातील साहेबांकडून काम करून देण्याच्या मोबदल्यात त्याच कार्यालयात काम करणारा खासगी व्यक्ती अविनाश सदाशिव सनंसे (वय ४९) याने लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला प्रत्येक नोंदणीसाठी ५ हजार रुपये प्रमाणे एकूण १५ हजार रुपये आणि काम सुरू करण्यासाठी १,५०० रुपये मागितले. मात्र तडजोडीनंतर एक हजार रुपयांची रक्कम ठरली.

तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला १ हजार रुपये देताच पथकाने अविनाश सनंसे याला रंगेहात पकडले. या प्रकरणी जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.