शेतकऱ्यांसाठी समाधानकारक बातमी ; केळी भावात वाढ, प्रति क्विंटलला मिळतोय ‘एवढा’ भाव?..

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी समाधानकारक एक बातमी आहे. आगामी महाशिवरात्री व रमजान ईदकरिता (Eid)केळी मालाची मागणी वाढली असून यामुळे खान्देशी केळीचा भाव खात आहे. किमान भावात ४०० ते ५०० रुपयांनी झालेली वाढ आता १,८०० रुपयांवर स्थिरावली असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.वाढतीसंक्रांतीनंतर ऊनाचे चटके बसू लागल्याने थंडीमुळे बागेत परिपक्वतेसाठी खोळंबलेला केळीमाल तयार होऊन आवक बऱ्यापैकी सुरू झाली होती. तथापि, मुंजोबाच्या यात्रांपासून थंडीचा जोर पुन्हा फिरून वाढल्याने केळीमालाची आवक काही अंशी खोळंबली आहे.

इतर ठिकाणांहूनही आवक सुरु होणारथंडीचा प्रकोप नसलेल्या आंध्र प्रदेशातील केळीमालाचा गुणात्मक दर्जा चांगला आहे. या शिवाय त्याची आवकही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु असे असताना येत्या महाशिवरात्रीचा व रमजान ईदचा सण उत्सव पाहता खान्देशी केळीमालाची बाजारात मोठी मागणी वाढली आहे. परिणामतः केळीमालाचे कमाल भाव २,२०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल वर स्थिर असताना किमान भाव मात्र १,३०० ते १,४०० रुपये प्रतिक्विंटलवरून ५०० रुपयांनी वाढून सद्यस्थितीत १,८०० रुपये किमान भावावर स्थिरावले आहेत.दरम्यान, आंध्र प्रदेशातील केळीमाल आता काही दिवसांनी संपुष्टात आल्यानंतर जळगावसह शहादा, शिरपूर तथा गुजरातमधील केळीमालाची आवक सुरू होणार असली तरी हळूहळू वाढ होत असलेल्या उष्णतेमुळे केळीमालाचीही मागणी वाढणारी असल्याने केळीभावात वाढ अपेक्षित ठरली आहे केळीची पुढील २५ दिवसांनंतर परदेशात निर्यातही सुरू होणार आहे.गेल्या पंधरवड्यात खान्देशात केळीची प्रतिदिन २४ ट्रक केळीची आवक झाली होती. त्यात पाच ते सहा ट्रकने मागील काही दिवसांत वाढ झाली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.