गावठी कट्ट्यासह तरुण पोलिसांच्या तावडीत.

जळगाव जिल्ह्यात अवैधपणे गावठी कट्ट आढळून येत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असून अशातच आणखी तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. ही कारवाई भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाली. अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (वय 30, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) असं अटक केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साई मंदिर परिसरात, अमर मधुकर कहार उर्फ परदेशी (वय 30, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) हा व्यक्ती अवैध अग्नी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, वरणगाव पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मंगळवार (दि.18) रोजी घडलेल्या या घटनेत, पोलीसांनी त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे (चार हजार रुपये किमतीचे) जप्त केले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामदास गांगुर्डे, पोलीस हेड कॉन्सटेबल यासिन सत्तार पिंजारी, प्रेमचंद वसंत सपकाळे, प्रशांत विनायक ठाकुर, ईश्वर तायडे आणि विजय बावस्कर यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.