मुंबई हादरलेली, 257 नागरिकांचा झालेला मृत्यू, गँगस्टर अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज.

न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेचा उल्लेख केल्यानंतर याचिका 10 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल, असे म्हटले आहे.मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गँगस्टर अबू सालेमने माफी मिळावी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला माफी मिळावी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे.

भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार त्याने सुमारे 25 वर्षे तुरुंगवास भोगला आहे.त्यामुळे त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी, असा दावा सालेमने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत केलाय. न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेचा उल्लेख केल्यानंतर याचिका 10 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल, असे म्हटले आहे.अबू सालेम आता 63 वर्षांचा आहे. भारताकडे प्रत्यर्पण होण्याआधी पोर्तुगालच्या तुरुंगातील कारावास, खटला सुरु असतानाच्या काळातील तुरुंगवास असा कालावधी 25 वर्षांचा होतो. त्याशिवाय भारत आणि पोर्तुगालमध्ये प्रत्यर्पण कराराच्या ज्या अटी होत्या, त्या आधारावर अबू सालेमने लवकर सुटकेची मागणी केली आहे. 3 फेब्रुवारीला त्याने याचिका दाखल केली.1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत विविध ठिकाणी शस्त्रास्त्र, दारुगोळा पोहोचवण्याचा अबू सालेमवर आरोप होता. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. मुंबई शेअर बाजार, झवेरी बाजार, एअर इंडिया इमारत, सी रॉक हॉटेल, जुहू सेंटॉर हॉटेल आणि अन्य ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. यात 257 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. 713 जण जखमी झाले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.