मुलाचे नाव राहुल वाल्मिकी होते. ज्याने आपल्या प्रेयसीसाठी धर्म बदलला होता. धर्म बदलल्यानंतर राहुलने स्वतःचे नाव ‘मुर्शीद’ असे ठेवले होते, पण असे असूनही प्रेयसीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडे लावले. याबद्दल प्रियकर राहुल उर्फ मुर्शीद खूप संतापला होता.उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केली. यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला पकडून मारहाण केली. पलानी पोलीस स्टेशन परिसरातील महावरा गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तरुण-तरुणी रिलेशनशिपमध्ये होते. पण मुलीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडेच लावले.मुलाचे नाव राहुल वाल्मिकी होते. ज्याने आपल्या प्रेयसीसाठी धर्म बदलला होता. धर्म बदलल्यानंतर राहुलने स्वतःचे नाव ‘मुर्शीद’ असे ठेवले होते, पण असे असूनही प्रेयसीच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसरीकडे लावले. याबद्दल प्रियकर राहुल उर्फ मुर्शीद खूप संतापला होता. त्याच्या प्रेयसीचे नाव झाकरीन होते. ती तिच्या खोलीत झोपली असताना राहुल उर्फ मुर्शीद छतावरुन तीच्या खोलीत पोहोचला.











