अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध, 24 वर्षांच्या तरूणीविरोधात बलात्कार, ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल.

दक्षिण मुंबईतून एक धक्कायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील एका 24 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला अटक झाली असून तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.दक्षिण मुंबईतून एक धक्कायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील एका 24 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार आणि ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीला अटक झाली असून सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ही अल्पवयीन मुलगी ही 17 वर्षांची असून ती सध्या 12 वीमध्ये शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पूर्व उपनगरात राहते तर तिचे नातेवाईक भेंडीबाजार परिसरात राहतात, तर आरोपी तरुणीदेखील त्याच परिसरात राहते. पीडित मुलगी ही नातेवाईकांकडे येऊन-जाऊन असल्याने तिची त्या तरुणीसोबत ओळख होती. त्याच दरम्यान, दोघींमध्ये बोलणे वाढले, मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झाले. मात्र हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तिला गावी पाठवलं. काही दिवस गावी राहिल्यानंतर ती अल्पवयीन मुलगी पुन्हा मुंबईत परतली व पालकांसोबत राहू लागली.

याचदरम्यान डिसेंबर महिन्यात 4 वर्षांच्या तरूणीने त्या मुलीशी संपर्क साधला आणि तिला भेटण्यास बोलावलं. दोघींनी सिनेमा पाहिला आणि मग पळून जायचे ठरवलं. ठरल्याप्रमाणे दोघी 6 जानेवारीला पळून गेल्या. बराच उशीर होऊनही मुलगी घरी न आल्याने पालकांनी शोधाशोध करून अखेर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता त्या दोघी विरारमधील एका रिसॉर्टमध्ये असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथे जाऊन दोघींना ताब्यात घेऊन मुंबईत आणले. दोघींमध्ये जे घडले ते समोर आल्यानंतर 24 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. दोन दिवस त्या हॉटेलमध्ये थांबल्या, तर तीन दिवस एका भाडय़ाचे घर घेऊन राहिल्या होत्या अशी माहिती देखील समोर आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..