विशाल गवळी मनोरुग्ण नाहीच, अल्पवयीन मुलीवर अत्याचार खून प्रकरणात अटक.

धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीचा हा वर्षभरातला दुसरा गुन्हा होता, याआधी अशाच प्रकरणात तो जेलमध्ये होता. मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आली होती. आता याच विशाल गवळीबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.कल्याण पूर्वेकडील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळ याच्यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नराधम विशालने त्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला आणि त्यानंतर पत्नी व रिक्षाचालक मित्राच्या सहाय्याने तिचा मृतदेह कब्रस्तानात फेकून दिल्याचे समोर आले होते. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीचा हा वर्षभरातला दुसरा गुन्हा होता, याआधी अशाच प्रकरणात तो जेलमध्ये होता. मात्र त्याने मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट दाखवत जामीन मिळवल्याची माहिती समोर आली होती. आता याच विशाल गवळीबाबत आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.

आरोपी विशाल गवळी हा मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात पोलिसांना कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.पोलिसांनी ठाणे मनोरुग्णालय, कल्याण न्यायालय व अन्य रुग्णालयांकडून माहिती मिळवली,मात्र आरोपी मनोरुग्ण असल्याचे दस्तऐवज कोणत्याही ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळेच तो मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले. विशाल गवळी विरोधात 6 गुन्हे दाखल असून त्यापैकी 2 हे विनयभंगांचे, 1 लैंगिक अत्याचाराचा,1 जबरी चोरीचा, आणि 2 गुन्हे हे मारहाण आणि जीवघेण्या हल्ल्याचे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये पोलीस वेळेत चार्जशीट दाखल करू न शकल्याने आरोपीला जामीन मिळवता आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

झोन 3चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि एसीपी कल्याण घेटे यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसापासून विशाल गवळी मनोरुग्ण असल्याने अनेक गुन्ह्यात बाहेर असल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता तसेच काहीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि तिची हत्या केल्याचा आरोप असलेला विशाल गवळी हा एक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले होते. त्याच्याविरोधात असंख्य गुन्हे आहेत. तसेच तडीपारीची देखील कारवाई केली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलींवर अत्याचाराचा हा काही त्याचा पहिलाच गुन्हा नव्हता, यापूर्वीही त्याने असे अश्लील कृत्य केले होते. ऑगस्ट 2023 मध्ये विशाल गवळीला एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी अटक झाली होती. क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा स्कूटीने पाठलाग करून भररस्त्यात तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न आरोपी गवळीने तेव्हा केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याला अटक झाली, मात्र आरोपीचा मुजोरपणा एवढा होता की पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याने V ( व्हिक्टरीचं) साईन दाखवत, कायदाही आपलं काही बिघडवू शकत नाही, कायद्याला घाबरत नसल्याचे त्याने या कृतीतून दर्शवलं होतं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..