तुमच्या पेन्शनवर सायबर चाच्यांची नजर, एका क्लिकवर अकाऊंट खाली, PFRDA केले सावधान.

पेन्शन फंडाची संपूर्ण रक्कम काढून देण्याचा दावा करणाऱ्यांपासून सावधान राहण्याचा इशारा सर्वसामान्य पेन्शनधारकांना पीएफआरडीए म्हणजेच पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाने दिला आहे. हे लोक मदतीच्या नावाखाली फसवणूक करणारे सायबर चाचे असू शकतात.तुम्हाला पैशांची गरज आहे आणि लोन घ्यायचं आहेत अशात तुमची नजर तुमच्या पेन्शन फंड किंवा पीएफ फंडवर पडते. तुम्हाला तुमच्या पेन्शनमधून अधिक पैसा काढायचा असेल,म्हणजे तुमचे काम होणार याची तुम्हाला खात्री असते. त्यामुळे दुसऱ्यांकडे हात पसरण्याची तुम्हाला काही आवश्यकता पडणार नाही.

अशा स्थितीत तुमची नजर एखाद्या वेबसाईट किंवा ईमेल वा एसएमएसवर जाते आणि तुमचे अकाऊंट खाली होते….असा फ्रॉड सध्या सायबर ठकांकडून सुरु आहे.जे असा दावा करतात करतात की पेन्शनचा संपूर्ण फंड काढून देतात तुमची मदत करतील अशांपासून सावध रहा. PFRDA ने ( पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी) सावधान केले आहे. पब्लिक नोटिस जारी करुन लोकांना अपिल केली आहे की असा दावा करणाऱ्यांपासून सावध राहा. कारण असा दावा करणारे सायबर ठग असू शकतात. जे फंड काढण्याच्या नावाखाली आपली आयुष्यभराची कमाई स्वाहा करु शकतात. एनपीएस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम आणि एपीवाय म्हणजे अटल पेंशन योजना अंतर्गत संपूर्ण फंड काढता येत नाही. नियमाप्रमाणे केवळ एकच हिस्सा काढता येतो.सायबर ठग कधी थांबलेली पेन्शन मिळवून देण्याच्या नावाने तर कधी जीवन प्रमाणपत्र अपडेट करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांना ठकवत आहेत.

वेळोवेळी सरकारी विभाग आणि बँकांच्या वतीने लोकांना यासंदर्भात सावधान केले जात आहे. तरीही सायबर ठकांविरोधात काही कारवाई झालेली नाही. सेंट्रेल पेन्शन अकाऊंटिंग ऑफीस म्हणजे सीपीएओने देखील आपल्या वेबसाईटवर स्पष्ट शब्दात सांगतले आहे की सायबर चाचे पेन्शनधारकांना त्याची जीवनप्रमाण-पत्र ऑनलाईन अपडेट करण्यास मदत करण्याच्या नावाखाली कॉल करत आहेत. आणि त्यांच्या पेन्शनवर डल्ला मारण्यासाठी नवनवीन आयुधांचा वापर करीत आहेत.सायबर गुन्हेगार पीडितांकडून त्यांच्या वैयक्तिक माहिती उदाहरणार्थ पेमेंट आदेश क्रमांक, जन्मतारीख, बँकेचा तपशील, आधार क्रमांक आदी सादर करण्यास सांगतात. त्यानंतर पडताळणीसाठी वन टाईम पासवर्ड (OTP) पाठवण्याचा दावा करतात आणि पेन्शनधारकाला OTP शेअर करण्याची विनंती करतात. एकदा का तुम्ही तुमचा ओटीपी नंबर दिला की ते तुमच्या पेन्शन खात्यात शिरकाव करीत तुमचे अकाऊंट बेनामी बँक खात्यावर ट्रान्सफर करीत असतात.त्यानंतर ही रक्कम पेन्शनधारकांना पुन्हा कधीच मिळत नाही. त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या नंतर लक्षात येते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..