गैरव्यवहारांचा ‘गाळउपसा’! मिठी नदीच्या घोटाळ्याची फाइल उघडली, १३०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप.

सन २००५पासून सुमारे १३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत असून १८ कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे. मुंबई महापालिकेकडून आणखी कागदपत्रे मागविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता कधीही राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने (एसआयटी) मिठी नदीच्या दोन दशकांतील गाळउपशाच्या घोटाळ्याची फाइल उघडली आहे. सन २००५पासून सुमारे १३०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत असून १८ कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे.

मुंबई महापालिकेकडून आणखी कागदपत्रे मागविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी गाळउपशामध्ये १,३०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सरकारच्या वतीने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त निशित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त संग्रामसिंग निशानदार, दोन सहायक आयुक्त, पोलिस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून या एसआयटीने कथित घोट्याळ्याची चौकशी सुरू केली आहे.मिठी नदीमधील गाळ वर्षानुवर्षे काढला जातो आणि त्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली जातात. तरीही मिठीतील गाळ तसाच असतो.

दोन दशकांच्या कालावधीत १८ कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली. या कंत्राटदारांनी नेमके काय काम केले, याचा लेखाजोखा एसआयटीने मुंबई महापालिकेकडून घेतला आहे. त्याआधारे ‘अक्यूट डिझाइन’चे ऋषभ जैन, ‘कैलास कन्स्ट्रक्शन’चे मनीष कासलीवाल, ‘मनदीप इन्टरप्रायझेस’चे शेरसिंग राठोड या तीन कंत्राटदारांची आत्तापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. या तिघांचे जबाब पूर्ण झाल्यानंतर इतर कंत्राटदारांना चौकशीला बोलावले जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.जवळपास वीस वर्षांचा कालावधी गेल्याने यामध्ये जुनी कागदपत्रे, दाखले तपासण्यासाठी अवधी लागेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. महापालिका एमएमआरडीएची हद्द आणि मिठी नदीच्या एकूण लांबीपैकी ११.८ किलोमीटरची हद्द मुंबई महापालिकेकडे असून उर्वरित सहा किलोमीटरपेक्षा जास्त भाग एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो. महापालिका आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्थांची कंत्राटे देण्याची पद्धत वेगवेगळी असून त्याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार विशेष पथक तपास करत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.