धनाजी काळे नगरात चोरट्यांचा धुमाकूळ : अडीच लाखांची रोकड लंपास !

मावसबहिणीच्या लग्नासाठी मलकापूर येथे गेलेल्या श्रीनिवास नारायण मुंगड (वय ३६, रा. धनाजी काळे नगर) या टुरीस्ट व्यावसायीकाच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची रोकड असा ऐवज चोरुन नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्याने मुंगड यांच्या घरातून कपड्यांसह फरसाण व फळे देखील चोरुन नेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील धनाजी काळे नगरात श्रीनिवास मुंगड हे आईसह वास्तव्यास असून त्यांचा टुरीस्टसाठी वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मावस बहिणीचे लग्न असल्यामुळे त्यांची आई या काही दिवसांपुर्वी लगीन घरी गेल्या होत्या. तर श्रीनिवास हे शनिवारी लग्नासाठी घराला कुलूप लावून मलकापूर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने श्रीनिवास यांच्या घराच्या कंपाऊंमधून उडी मारुन चोरट्याने मुंगड यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले सोन्या दागिन्यांसह रोकड घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्याने चालक सोनार याने मालकाला फोन करुन तुम्ही घरी आहे का? अशी विचारणा केली. त्यावर मुंगड यांनी मी लग्नात असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी मुंगड यांनी तात्काळ आपल्या मित्राला कॉल करुन घराकडे जाण्यास सांगितले.त्यांचा मित्र हा मुंगड यांच्या घरी गेला असता, त्याला घरातील सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. मित्राने घरफोडी झाल्याचे सांगताच श्रीनिवास मुंगड हे लागलीच मलकापूर येथून दुचाकीने जळगावला येण्यासाठी निघाले. घरी आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.