ट्राफिक जाम होतेच कशी? तरुणाने थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली, नाशिकमधील घटना.

‘वाहतूक कोंडी होतेच कशी’ असे विचारून अंमलदाराला चापट मारल्याप्रकरणी अनिकेत भाऊसाहेब पवार (वय २७, रा. श्रमिकनगर) या संशयितावर गुन्हा नोंद आहे. त्याला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.दोन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास अमृत गार्डन चौकापासून कार्बन नाक्याकडे जाणाऱ्या अशोकनगर रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीवेळी पोलिसांशी हुज्जत घालणे तरुणाच्या अंगलट आले आहे.’वाहतूक कोंडी होतेच कशी’ असे विचारून अंमलदाराला चापट मारल्याप्रकरणी अनिकेत भाऊसाहेब पवार (वय २७, रा. श्रमिकनगर) या संशयितावर गुन्हा नोंद आहे. त्याला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

वाहतूक शाखा युनिट तीनचे अंमलदार राजू खंडेराव गवळी (वय ५४) यांनी सातपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. गवळी हे रात्री आठ वाजेच्या सुमारास कर्तव्य बजावित असताना बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी वाहतूक नियोजनाचे काम गवळी करीत असताना दुचाकीवरून संशयित तेथे आला. त्याने ‘तुम्ही शासनाचा पगार घेता तर वाहतूक कोंडी होतेच कशी’, अशी तितारणा केली. त्यानंतर पोलिसांशी त्याने हुज्जत घालून अंमलदाराच्या डोक्यावर चापट मारली. यासह दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणून अंमलदाराला इच्छापूर्वक दुखापत केली.

त्यावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दुचाकी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने दुचाकीस्वाराच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना श्रमिकनगर भागात घडली. गणेश आहिरे (वय २३), बाबू यादव (वय २०) व साहिल गांगुर्डे (वय २१, रा. श्रमिकनगर) अशी संशयितांची नावे आहेत. त्याबाबत समाधान तुळशीराम तालखे (रा. श्रमिकनगर) याने फिर्याद दिली आहे. तालखे सायंकाळी गंगासागर नगर भागातून दुचाकीवरून घराकडे जात असताना ही घटना घडली. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा नोंद आहे.सोनसाखळी खेचली देवदर्शन करून घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपयांची सोनसाखळी हिरावाडीतील सिद्धेश्वर मंदिराबाहेर चोरट्यांनी खेचली. याप्रकरणी मालती गोकुळ शेलार (रा. हिरावाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंचवटी पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.