१९ वर्षीय प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला, धारदार शस्त्राने वार करुन पळून गेला, अखेर…

 आरोपी कुणाल पासवान याने पीडितेस त्याच्या घरी नेतो असे सांगून सरवली गावाच्या पुढील रोडवर नेऊन धारधार कटरने तिच्या मानेवर तसेच हातावर वार केल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे.प्रेयसीवर अत्याचार करुन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. १९ वर्षीय प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावला असता प्रियकरानं बहाण्याने बोलवून पीडित प्रेयसीवर अत्याचार केला. त्यांनतर धारदार शस्त्राने हल्ला करून तिला गंभीर अवस्थेत टाकून पळून गेलेल्या नराधम प्रियकराला, कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल पासवान असे अटक आरोपी प्रियकराचे नाव असून त्याने पीडितेच्या मानेवर व हातावर कटरने वार केले असल्याने पीडितेवर मुंबई येथील जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरवली गावातील १९ वर्षीय पीडित तरुणी कुटूंबासह राहते तिचे त्याच भागात राहणाऱ्या कुणाल पासवान याच्यासोबत मैत्री होती. त्यातच मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता पीडित तरुणी कोठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी, कोनगाव पोलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास तक्रार दाखल केली. मात्र त्याच दिवशी काही तासांतच सकाळी पीडितेच्या नातेवाईकांना पोलिसांनी फोन करून “तुमच्या मुलीवर चाकूने हल्ला झाला असून तिला जखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून आरोपी फरार झाला” असल्याची माहिती दिली.

तर दुसरीकडे पीडित तरुणीला गंभीर जखमी पाहून एका रिक्षा चालकाने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानं पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने पीडितेला पुढील उपचारासाठी मुंबई जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मुंबई येथील रुग्णालयात जाऊन पीडितेकडे चौकशी केली असता, कुणाल पासवान याने आपण लग्न करू, असे आश्वासन देत अत्याचार केल्याचे सांगितले. आरोपी कुणाल पासवान याने पीडितेस त्याच्या घरी नेतो असे सांगून सरवली गावाच्या पुढील रोडवर नेऊन धारधार कटरने तिच्या मानेवर तसेच हातावर वार केल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.