ए जास्त रडू नका रे, आरडाओरड कमी; चेंगराचेंगरीत बायको गमावली, पोलिसांनी नवऱ्याला दटावलं.

विपिन झा पत्नी ममता यांच्यासोबत बिहारमधील समस्तीपूरहून स्वातंत्र्य सेनानी ट्रेनने दिल्लीला येत होते. ते रात्री ८ वाजता नवी दिल्लीला पोहोचले.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली. यानंतर दुसऱ्याच दिवशी रविवारी नवी दिल्ली स्थानकावर गर्दी उसळलेली पाहायला मिळाले. हजारो प्रवासी रेल्वे डब्यांमध्ये शिरताना संघर्ष करत होते. प्रवाशांचा स्थानकावर येणारा ओघ वाढताच आहे. यामध्ये बहुतांश प्रवासी महाकुंभच्या निमित्ताने प्रयागराजला जाणारे आहेत.

मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने परस्थिती हाताळणे कठीण होत असल्याचे सांगण्यात आले. रविवारी अनेक प्रवास चेंगराचेंगरी झालेल्या पुलावर, फलाटावर उभे राहण्यासाठीही ओढाताण करत होते. ‘जे घडले त्यानंतरही स्थिती तशी आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. परंतु लोकांची संख्या अधिक आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या आप्तांच्या हृदय हेलावणाऱ्या कहाण्या समोर आल्या आहेत. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, एका रुग्णालयांबाहेर दिल्ली पोलीस अधिकारीही हातात कागदपत्रे घेऊन विचारत होते, की तुम्ही ममता झा यांच्या कुटुंबातील आहात का? तिचा नवरा कोण आहे? त्यापैकी एकाने हातात पाण्याची बाटली धरलेल्या माणसाकडे बोट दाखवले. तो विपिन झा आहे. ममताचा नवरा. आम्ही नातेवाईक आहोत. त्या पोलिसाने त्याला त्याच्या घराचा पत्ता विचारला. त्याने सांगितले की नांगलोई बी-ब्लॉक.विपिन झा पत्नी ममता यांच्यासोबत बिहारमधील समस्तीपूरहून स्वातंत्र्य सेनानी ट्रेनने दिल्लीला येत होते. ते रात्री ८ वाजता नवी दिल्लीला पोहोचले. दीड तासानंतर चेंगराचेंगरी झाली. ते पायऱ्यांच्या रेलिंगवर अडकले आणि चिरडले गेले. पत्नी ममताही चिरडल्या गेल्या. त्यांचे प्राण गेले.आम्हाला बराच काळ रुग्णालयात डांबून ठेवण्यात आले. जास्त रडू नका आणि आरडाओरड करु नका, असंही सांगण्यात आलं. माध्यमांशी बोलू नका, असं केल्याने समस्या निर्माण होतील. शवविच्छेदनानंतर मृतदेह लवकरात लवकर ताब्यात दिला जाईल, असं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.