जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या मनमर्जी कारभार व त्यांनी केलेल्या आर्थिक देवाण घेवाण याची चौकशी करून त्याची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना ,राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनानी ,सार्वजनिक आरोग्य मंत्री,जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन दिलीत ,या निवेदनाला आज 24 दिवस उलटले तरी देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाही झालेली नाही वैद्यकिय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे. डॉक्टरांना अरेरावीच्या भाषेत बोलणे प्रत्येक कामात आर्थिक व्यवहार करणेस भाग पाडणे या सारख्या तक्रारी त्याच्या विरोधात असतांना देखील त्याच्या विरोधात कारवाही न होणे हे संशयास्पद असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात आधीच आरोग्याच्या समस्या भेडसावत असतांना अश्या खंडणी खोर जिल्हा शल्य चिकित्सकामुळे जिल्ह्याची आरोग्य स्थिती खालावली आहेत त्यामुळे अश्या अधिकारीची बदली होणे गरजेचे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्यावर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर मेग्मो संघटनांसह इतर संघटना आंदोलनाची पवित्रा घेणार आहेत 18 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी पर्यंत काळ्या फीती लावून काम करणे ,24 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत धरणे आंदोलन ,3 मार्च ते 9 मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून काम बंद आंदोलन करणे व तरीदेखील जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई झाली नाही तर 10 मार्च पासून मेग्मो संघटना सह सर्व संघटना बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला .यासंदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले आहे .यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना (मेग्मो) चे अध्यक्ष डॉ जर्मन सिंग पाडवी, उपाध्यक्ष डॉ सुनील वळवी, सचिव डॉ अजित कोठारी, उपाध्यक्ष डॉ विशाल चौधरी, डॉ अनिल गावित ,डॉ नरेश पाडवी डॉ किसन पावरा डॉ रोहन थोरात ,डॉ रोहित वसावे, डॉ श्रीकांत पावरा ,डॉ सुलोचना बागुल, डॉ रणजीत पावरा , निलीमा वळवी ,मनीषा वळवी, दुर्गा पाडवी ,अंजू पाडवी ,प्रशांत मोहिते, सुषमा गावित तसेच मेग्मो संघटना , राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना चे सदस्य उपस्थित होते…..









