NCP शरद पवार गटाचे प्रवक्ता विकास लवांडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याबाबत भडगांव पोलिस निरीक्षक यांना निवेदन.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भडगांव च्या वतीने भडगाव पोलिस निरीक्षक यांना नुकतेच निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ता विकास लवांडे यानी खालील आशयाचे भावना दुखवणारे व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे वक्तव्य केले. “हा संभाजी भिडे स्वतः ला गुरुजी समजतो त्याने हजारों धारकरी पोर जी आहेत ज्यांना स्वतःची विवेकबुद्धी वापरायची नसते अशा धारकर्यांना घेऊन तिथे गडकिल्ले मोहीम वैगरे राबविण्यात त्यांचा काहीतरी प्रकार असतो, गडांच काहीतरी सांगायचं, शिवाजी महाराजांच अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा त्यांची माथी भडकाविण्याचे कार्यक्रम करायचा, त्यांना एक हिंदू आतंकवादी बनविण्याचाच तो एक प्रकार आहे, धारकरी हे आतंकवाद्याच्याच मोड मध्ये जाणारे असतात, हे सद्सद्विवेक बुद्धीने विचार करणारे नसतात…”

या आशयाचे अतिशय संतापजनक क्लेशदावी बिनबुडाचे बेताल वक्तव्य करून मा. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले संभाजीराव भिडे गुरुजी यांचे विषयी व श्री शिवछत्रपती प्रभूच्या पदस्पशनि पावण झालेल्या दुर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमी धारकयों विषयी अतितय बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद व आतंकवाद्यांशी संतापजनक तुलना केली.हे वक्तव्य मी व माझे असंख्य धारकरी धर्मबंधु यांनी दिनांक १३/२/२०२५ रोजी यू ट्यूबवर सत्याग्रही या चॅनेल वर पहिले यामुळे माझ्या व धारकरी धर्म बंधूंच्या तसेच हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे वक्तव्य करणा‌ऱ्याा ह्या शरद पवार गटाच्या तथाकथीत प्रदेश प्रवक्त्यावर आम्हा हिंदु बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भडगाव व द्रविड चावरे, सुरज पाटील, आशुतोष पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सागर भोई, गौरव भोई, तेजस भोई, विश्वदिप पाटील, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.