कर्नाटकातील म्हैसूर येथील एका घरात सोमवारी आई, मुलगा, सून आणि नातू असे चौघे जण मृतावस्थेत आढळले. एकाच कुटुंबातील चौघा जणांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाने कुटुंबाची सामूहिक हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे, मात्र मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही.चेतन (४५), त्याची पत्नी रुपाली (४३), त्यांचा १५ वर्षीय मुलगा आणि चेतनची आई प्रियंवदा (६२) अशी मृतांची नावे आहेत. चेतन हा एक व्यापारी होता. तो त्याच्या कुटुंबासह म्हैसूर येथील विश्वेश्वरैया नगरमध्ये राहत होता. त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे.










