सरकारी अभियंता कुबेर निघाला; ६ ठिकाणांवर छापे; १७ भूखंड, १८ बँक खाती सापडली; एका टिपमुळे गेम.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कुबेर निघाला आहे. दीपक कुमार मित्तलच्या घरावर भ्रष्टाचारविरोधी पथकानं छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे उत्पन्नाच्या २०५ टक्के अधिक संपत्ती सापडली.सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता कुबेर निघाला आहे. दीपक कुमार मित्तलच्या घरावर भ्रष्टाचारविरोधी पथकानं छापा टाकला. तेव्हा त्याच्याकडे उत्पन्नाच्या २०५ टक्के अधिक संपत्ती सापडली. जोधपूर, जयपूर, उदयपूर आणि हरियाणातील फरिदाबादमधील सहा ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याच्या मालकीचे १७ भूखंड सापडले आहेत. मित्तलकडून ५० लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. मित्तल राजस्थानच्या सार्वजनिक विभागात अभियंता म्हणूत कार्यरत आहे.

दीपक कुमार मित्तल अगदी सर्रास लाच घ्यायचा, अशी माहिती एसीबीला मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा केली. यानंतर मित्तलविरोधात ऑपरेशन बेफिक्र सुरु करण्यात आलं. दीपक कुमार मित्तल आज ५० लाख रुपयांची लाच घेण्यात येणार असल्याची टिप एसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ५० लाख रुपयांची रोकड मित्तल दोनच दिवसांत जमिनीत गुंतवणार असल्याची खात्रीलायक माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर एसीबीनं अभियंत्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या.दीपक कुमार मित्तलकडे आतापर्यंत ५ कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती सापडली आहे. त्याचे ३ बँक लॉकर्स अद्याप उघडायचे आहेत. मित्तलनं त्याच्या नातेवाईकांच्या नावांवरही प्रचंड प्रमाणात बेनामी मालमत्ता ठेवलेली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मित्तलच्या नातेवाईकांच्या उत्पन्नाची माहिती गोळा करण्याचं काम एसीबीचे अधिकारी करत आहेत.आरोपी अभियंत्याचा मुलगा उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एमबीबीएस करत असून मुलगी राजस्थानच्या चुरुमध्ये एमडीचा अभ्यास करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात काम करत असल्यानं मित्तलची अनेकदा बदली झाली. तो ज्या ज्या शहरातंमध्ये राहिला, तिथे तिथे त्यानं संपत्ती खरेदी केली. जयपूरमध्ये त्याचे ४ भूखंड आहेत. त्याची किंमत १ कोटी रुपयांच्या घरात आहे.उदयपुरात मित्तल यांच्या मालकीचे १० भूखंड असून त्यांचं बाजारमूल्य १.५० कोटी रुपये आहे. ब्यावर, अजमेरमध्ये ३ भूखंड असून त्यांची किंमत लाखोंच्या घरात जाते. जयपूरच्या बरकत नगरमधील घरात ५० लाख रुपये रोकड, अर्धा किलो सोनं आणि दीड किलो चांदी सापडली आहे. आरोपी अभियंत्याची १८ बँक खाती आहेत. त्यात जवळपास ४० लाख रुपये आहेत. तर म्युच्युअल फंडात ५० लाख रुपयांची गुंतवणूक आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.