तडे गेलेल्या स्क्रीनमधून लेकीचा फोटो दाखवला, बाप ढसाढसा रडला; डॉक्टर म्हणाले लवकर आला असतात तर…

 ओपिल सिंग दिल्लीत मजुरी करतात. त्यांनी सांगितले की आमचे तिकीट कन्फर्म झाले होते, पण गर्दी इतकी होती की आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन तीन बालकांसह १८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बिहारमधील नऊ, दिल्लीतील आठ आणि हरियाणातील एकाचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतरही रविवारी दुपारी स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसली. या अपघातात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी ओपिल सिंह यांची ७ वर्षांची मुलगी रिया हिचाही मृत्यू झाला. चेंगराचेंगरीदरम्यान रियाच्या डोक्यात एक खिळा घुसला.

ओपिल सिंग दिल्लीत मजुरी करतात. त्यांनी सांगितले की आमचे तिकीट कन्फर्म झाले होते, पण गर्दी इतकी होती की आम्ही घरी परतण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या पत्नी आणि मुलीसह प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरुन खाली उतरत होतो, पण गर्दी पाहून आम्ही परत येऊ लागलो. मी माझ्या पत्नीला सांगितलं, की खूप गर्दी आहे, चल घरी जाऊया, तुम्ही ट्रेनमध्ये चढू शकणार नाही, लहान मुले आहेत, त्यांना झोपायलाही जागा मिळणार नाही.‘प्लॅटफॉर्मवर गर्दी एकाएकी वाढू लागली आणि चेंगराचेंगरी झाली. मी प्रयागराजला जाणारी ट्रेन सोडली आणि घरी परतण्यासाठी पुलावरून वाट धरली आणि पायऱ्या चढू लागलो. त्या वेळी समोरून शेकडो लोक खालच्या दिशेने आले आणि जागेसाठी त्यांचे सामान देऊन ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव करीत होते. इतक्यात मुलीचा हात माझ्या हातातून निसटला आणि ती पायऱ्यांजवळील रिकाम्या जागेत पडली.’असं ओपिल सिंह यांनी साश्रू नयनांनी सांगितलं‘गर्दी वाढल्याने तिच्यावरून लोक धावले आणि दबाव वाढल्याने लोखंडी रॉड तिच्या डोक्यात घुसला. तेव्हा रुग्णवाहिका नव्हती आणि आमची पर्सही खाली पडली होती. दोन कुलींनी प्रत्येकी १०० रुपयांची मदत केली. अर्ध्या तासांच्या कसरतीनंतर तिला रुग्णालयात घेऊन गेलो; पण खूप उशीर झाला होता’ असं ओपिल सिंह म्हणाले.डॉक्टर म्हणाले, की तुम्ही जरा लवकर आला असता, तर बरे झाले असते. आपले अश्रू रोखत ओपिल सिंह यांनी आपल्या मोबाईलवर मुलगी रियाचा फोटो दाखवला. मोबाईल स्क्रीनच्या काचेवर भेगा आणि ओरखडे दिसत होते. ओपिल यांनी संतापून विचारलं, की माझी मुलगी सरकारकडून १० लाख रुपये घेऊन परत येईल का? पण या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नव्हतं.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.