अजितचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो मूळचा कोल्हापूर येथील राहणारा होता. कामानिमित्त तो पिंपरी चिंचवड शहरात राहायला होता. त्यांचा संसार आनंदात सुरु होता.जगभरातील प्रेमी युगुलांचा सर्वात आवडता दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन-डे नुकताच साजरा करण्यात आला. मात्र, याच दिवशी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली. त्यानंतर पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार केली. या कारणावरुन एका आयटी अभियंत्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.अजित दत्तात्रय थोरवत (वय ३० वर्ष) असं आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वांचंच मन हेलावले आहे. अजित याची पत्नी गर्भवती असल्याची माहिती देखील समोर आली आहे.










