अडीच कोटींचे अमली पदार्थ जप्त, सात आरोपी जेरबंद, एमडी तस्करीचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड.

अमली पदार्थ विरोधी पथकाने उल्हासनगर, अंबरनाथ आणि शिळ-डायघरमध्ये केलेल्या तीन कारवायांमध्ये एकूण २ कोटी ६० लाखांचे मेफोड्रॉन आणि गांजा जप्त केले आहेत. या कारवायांमध्ये सात आरोपींना अटक करण्यात आली असून आंतरराज्यीय कनेक्शनचा तपास सुरू आहे.ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन कारवायामध्ये अडीच कोटीपेक्षा जास्त किंमतीचे मेफोड्रॉन (एमडी), गांजा जप्त करत सात आरोपींना अटक केली. यामध्ये २ कोटी ३७ लाखांचे १ किलो १६७ ग्रॅम एमडी आहे. एमडी विक्रीचे आंतरराज्यीय कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

एमडीची पहिली कारवाई सोमवारी उल्हासनगरमध्ये करण्यात आली. येथील नंबर तीनमध्ये ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत ११ लाख ७२ हजार ५०० रुपयांचे ५८.१ ग्रॅम एमडी जप्त केले. या कारवाईत आरीफ मोहमद शरीफ खान, सफीकुर रेहमान सिराज अहमद खान या तरुणांना अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी अंबरनाथमधील भोईरनगरमधून मंगल उत्तम पवार आणि अमर सुभाष पवार यांना अटक करत २२ लाख ८५ हजार १०० रुपयांचा ४४ किलो ८५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.या कारवायानंतर पोलिसांनी शिळ-डायघरधील ठाकुरपाड्यातील चेतन अपार्टमेंटमध्ये छापा टाकत २ कोटी २५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचे १ किलो १०९ ग्रॅम एमडी जप्त केले. या प्रकरणी इलियास कुशहाल खान, अमान कमाल खान या दोन राजस्थानच्या तरुणांसह शिळ-डायघरमध्ये राहणारा सैफअली असाबउल हक खान याला अटक केली. या तिन्ही कारवायामध्ये एकूण २ कोटी ६० लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे पोलिस अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल मस्के यांच्या पथकाने केली.शिळ-डायघरमधील कारवाईत जप्त एमडी राजस्थानवरुन आणल्याची बाब पोलिस चौकशीत समोर आली आहे. त्यामुळे अमली पदार्थ विक्रीचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमली पदार्थ परराज्यात तयार करुन ते महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जाते. या प्रकरणातील आरोपींनी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यातही अमली पदार्थांची विक्री केल्याची बाबही पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाली. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.