रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर, ५ गर्भवती महिला रुग्णालयात बसलेल्या आढळल्या. यापैकी २ गर्भवती महिला बुलढाणा जिल्ह्यातील, २ अकोला जिल्ह्यातील आणि १ वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील होती. वरिष्ठांना छाप्याची माहिती दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या विभागीय पथकाने सोनोग्राफी मशीन सील केली.आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील नामांकित रुग्णालयात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गर्भ लिंग निदान केंद्रावर सापळा रचून कारवाई केली आहे. आरोग्य विभागाच्या ६ सदस्यांच्या पथकाला वाशिम जिल्ह्यामधील, कारंजा शहरातील राठोड मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटलमध्ये लिंग निदान केले जाते अशी गुप्त माहिती मिळाली होती. ६ सदस्यांच्या पथकाने सापळा रचला.










