सरकारी नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा घृणास्पद प्रकार; पाच विद्यार्थ्यांना अटक, छळवणुकीचे चित्रिकरणही केले.

वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी या रॅगिंगचे चित्रीकरणही करत असत. या प्रकारांबाबत कुठे वाच्यता केल्यास, अथवा पोलिस तक्रार केल्यास हे चित्रीकरण व्हायरल केले जाईल व यामुळे केवळ तुमची बदनामीच होणार नाही तर, तुमचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात येईल, अशी धमकी ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना देत होते. या महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची नोव्हेंबर २०२४पासून छळवणूक करत होते.केरळच्या कोट्टायम येथील एका सरकारी नर्सिंग महाविद्यालयात रॅगिंगचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून कनिष्ठ विद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या पाच वरिष्ठ विद्यार्थ्यांना कोट्टायम गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रॅगिंगचा हा अमानुष प्रकार तीन महिन्यांपासून सुरू होता. पीडित विद्यार्थ्यांनी धीर करून पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांची नोव्हेंबर २०२४पासून छळवणूक करत होते. धक्कादायक बाब म्हणजे, वरिष्ठ वर्षातील विद्यार्थी या विद्यार्थ्यांना विवस्त्र करून उभे करत व व्यायामासाठीचे डंबेल्स त्यांच्या गुप्तांगाला टांगत असत. याशिवाय, कंपास पेटीतील कर्कटकने या विद्यार्थ्यांना जखमी केले जात असे व त्या जखमांवर लोशन चोळले जात असे. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, हातापायांवरही लोशन फासण्याचा प्रकार होत होता.वरिष्ठ वर्गातील विद्यार्थी या रॅगिंगचे चित्रीकरणही करत असत. या प्रकारांबाबत कुठे वाच्यता केल्यास, अथवा पोलिस तक्रार केल्यास हे चित्रीकरण व्हायरल केले जाईल व यामुळे केवळ तुमची बदनामीच होणार नाही तर, तुमचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात येईल, अशी धमकी ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना देत होते.विविध शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पुन्हा एकदा कठोर पावले उचलली आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात देशभरातील कोणत्याही उच्च शिक्षणसंस्थेत अशा घटना घडू नयेत, यासाठी ‘यूजीसी’ने काही सूचना केल्या आहेत. त्यानंतरही रॅगिंगच्या घटना घडल्या, तर अशा संस्थांवर कठोर कारवाईचा इशारा ‘यूजीसी’ने दिला आहे. विशेष म्हणजे, या घटना रोखण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत अँटि-रॅगिंग समितीची स्थापना होणे अनिवार्य असल्याचे ‘यूजीसी’ने सर्व संस्थांना पाठवलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रत्येक संस्थेत महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असेल. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संबंधित घटना कैद झाल्यास तातडीने त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशा घटनांना आळा बसावा, अशी अपेक्षाही ‘यूजीसी’ने व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.