मृतदेहाजवळ तब्बल सहा तास तळ ठोकून असलेल्या श्वानामुळे त्याच्या मृतदेहाचा नातेवाइकांना शोध घेता आला. ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार जंगलात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दगडाने डोक्यावर वार करून जंगलात ५६ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला. मृतदेहाजवळ तब्बल सहा तास तळ ठोकून असलेल्या श्वानामुळे त्याच्या मृतदेहाचा नातेवाइकांना शोध घेता आला. ही घटना कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार जंगलात सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.देविदास रामाजी चचाने (वय ५६, रा. वॉर्ड क्रमांक-२, पिल्कापार, कळमेश्वर), असे मृताचे नाव आहे. देविदास हे अजारी जनावरांना बरे करण्यासाठी आयुर्वेदिक औषध तयार करून त्याची विक्री करायचे. प्राप्त माहितीनुसार, देविदास यांना जसवंत व दर्शन ही दोन मुले आहेत. जसवंत हा शेतीचे काम करतो तर दर्शन सोलर कंपनीत कार्यरत आहे. चचाने कुटुंबाकडे २० म्हशी असून त्यांचा दूध विक्रीचाही व्यवसाय आहे. देवीदास हे नेहमी सकाळी १० वाजता खुर्सापार जंगलातील तलावाजवळ म्हशी चारायला घेऊन जायचे व सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत घरी परत यायचे.










