नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय रविंद्र बी.सोनवणे सर यांचे स्वलिखित’ बालकाव्य साहित्य आभाळाची सावली ‘पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिध्द लेखक कवी तसेच पहिल्या बालसाहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष एकनाथ आव्हाड साहेब, प्रकाशक ज्योती कपिले मॅडम, कवी सदानंद पुंडपाळ यांचे शुभ हस्ते, नॅशनल लायब्ररी वांद्रे मुंबई येथे करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटक माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, तसेच स्वागताध्यक्ष पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री नयना आपटे यांचीही उपस्थिती लाभली. रविंद्र सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे वतीने कविता सादरीकरणासाठी निवड झाली होती. तेथे साहित्यिक रविंद्र सोनवणे यांनी कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा एकच ठेका धरला. आभाळाची सावली पुस्तक प्रकाशनासाठी नुतन मराठा संस्थेचे मान. मानद सचिव भाऊसो निलेशजी भोईटे यांनी शुभेच्छा दिल्या. नेहरू विद्यालय किनगाव चे मान चेअरमन आबासो उमाकांतजी पाटील तसेच शिक्षक बंधू भगिनी यांनी शुभेच्छा दिल्या.









