जुळ्या बहिणीसोबत भयंकर घटना घडल्याचं समोर आलं आहे. ६ वर्षीय जुळ्या बहीण शाळेत गेल्या त्या आल्याच नाहीत. शोधावेळी शेतात अंगावर काटा आणणारी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुळ्या बहिणी घराशेजारीच असलेल्या शाळेत गेल्या होत्या. मात्र रोजची घरी येण्याची वेळ उलटून गेली तरी त्या घरी आल्या नव्हत्या. मुली घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोधाशोध सुरू होती. नंतर रात्री दोघींबाबत अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. जुळ्या बहिणींचा गावातील एका शेतात मृतदेह आढळला आणि सर्वाच्या पायाखालची जमिनीच सरकली.










