धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चंट नेव्हीत कार्यरत तरुण यश देवरे समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे. कंपनीने कुटुंबियांना बेपत्ता असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे कंपनीकडून दिली जात आहेत. यशच्या कुटुंबिय चितेंत आहेत.धुळे जिल्ह्यातील देऊर गावातील मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेला तरुण बेपत्ता झाला आहे. यामुळे मोठी खळबळ निर्माण झालीये. कंपनीने कुटुंबियांना फोन करून त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची माहिती दिली. मात्र, त्यानंतर आता कंपनीकडून कुटुंबियांना उडवाउडवीचे उत्तर दिली जात आहेत. मुलगा बेपत्ता होऊन तब्बल बारा दिवस उलटल्याने कुटुंबिय तणावात आहेत. अनेकदा फोन करूनही मुलाची माहिती मिळत नाहीये. समुद्रात पडल्याने यश हा बेपत्ता झाल्याचे सांगितले जातंय.










