जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा .

जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणास येणार गती. चिंचोली-नशिराबाद-उमाळारस्ता व पुलाच्या कामासाठी 6 कोटी 60 लाख निधी मंजूर ! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा फळास जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारासाठी मोठी पुढची वाट मोकळी झाली आहे. धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या नशिराबाद-उमाळे प्रतिमा 18 हा रस्ता बंद करून त्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चे साखळी क्रमांक 13 /00 ते 18/00 कि.मी. दरम्यान रुंदीकरण करणे , चिंचोली ते नशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वहिवाट रस्ता देणे व वहिवाट रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधकामासाठी 6 कोटी 60 लाख 70 हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय व विधी मान्यता देऊन सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 5 जुलै 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार एकूण 10 कोटी निधीची मागणी करण्यात आली होती. शक्तीप्रदत्त समितीने 14 जानेवारी 2025 रोजी प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने हा निधी मंजूर केला आहे.धावपट्टी विस्ताराच्या कामांमुळे जळगाव जिल्ह्यातील विमानसेवा अधिक सक्षम होणार असून, औद्योगिक विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. पुढील काही महिन्यांत या कामांची गती वाढवली जाणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालकमंत्र्यांचा पाठपुरावा फळास, शेतकऱ्यांचे आभार सध्या जळगाव विमानतळावरून हैदराबाद, गोवा, पुणे या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. या विस्तारीकरणामुळे विमानसेवा अधिक सक्षम होणार असून शेतीमालाच्या कार्गो वाहतुकीस गती मिळणार असल्याने व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. नशिराबाद व चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आभार मानले आहेत. हा निर्णय केवळ विमानतळाच्या विस्तारासाठी नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या सोयींसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. आता मंजूर निधीच्या अनुषंगाने विस्तारीकरणाची कामे वेगाने सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.