ज्या दिवशी डॉ. वाजे यांची हत्या झाली, त्या दिवशी त्या एका व्यक्तीला भेटल्या होत्या. ती व्यक्ती नेमकी कोण, त्यांच्या भेटीत नेमके काय झाले, या संदर्भात पोलिसांना ठोस पुरावे सादर करता आले नाहीत.महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित पती डॉ. संदीप वाजे, यशवंत म्हस्के यांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. रुपेश राठी यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. रुपेश राठी यांच्यासमोर खटला चालून त्यावर सोमवारी (ता. १०) सुनावणी झाली. यात न्यायालयाने मुख्य संशयित डॉ. संदीप वाजे, यशवंत म्हस्के यांची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल देताना मात्र न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले आहेत.










