अंधेरी पश्चिमेतील ओशिवरा येथील लाकडी फर्निचरच्या मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे. येथे झालेल्या सिलेंडर ब्लास्टमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. मुंबईतील जोगेश्वरी-ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज मंगळवारी (११ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास या फर्निचर मार्केट आणि लाकडी गोदामाला भीषण आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील रिलीफ रोडवर असलेल्या घास कंपाऊंडमध्ये सकाळी साडे ११ च्या सुमारास ही आग लागली.










