अलिबागमध्ये खळबळ! दीड कोटींच्या सोन्याचा बनावट घोटाळा, आमदाराच्या अंगरक्षकांचा समावेश.

रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या तिनविरा धरण नजिक दीड कोटीचा दरोडा काही दिवसात टाकण्यात आला होता. या गुन्ह्यातील दीड कोटी दरोडा मधील दीड कोटी रुपयांची रक्कम सांगली आटपाडी येथून जप्त करीत दोन आरोपी यांना ताब्यात घेतले असून आरोपीची एकूण संख्या ही सहा झाली आहे.अलिबागमध्ये बनावट सोने घोटाळा प्रकरणात मोठा खुलासा झाला असून, आरोपींनी १ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक करून पैसे लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख आरोपी समाधान गणपत पिंजारी आणि त्याचा सहकारी दीप गायकवाड यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या कटात तीन पोलीस अंमलदारांचाही सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील दोन पोलिस कर्मचारी आमदार यांच्या बंगल्यावर संरक्षणार्थ कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.१५ दिवसांपूर्वी समाधान पिंजारीने त्याच्या मूळगावातील व्यवसायिक नामदेव हुलगे यांना कमी किमतीत ७ किलो सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे नामदेव हुलगे यांनी आपल्या नातेवाईक ओमकार वाकशे यांना याची माहिती दिली. दोघांनी मिळून १ कोटी ५० लाख रुपये गोळा केले. आणि ४ फेब्रुवारी रोजी अलिबागकडे रवाना झाले.

सदर इनोव्हा गाडी अटक आरोपी दीप गायकवाड हा चालवत होता. सदर गाडी पोयनाडच्या पुढे तिनवीरा डॅम येथे आली असता, अटक आरोपी समाधान पिंजारी यांने सदर गाडी तिनवीरा डॅम येथे थांबवली. त्यावेळी त्याने फिर्यादी व सहकारी यांना पुढे पोलीस चेकींग चालु आहे. व मी शंकर कुळे यास सोने घेवुन याच ठिकाणी बोलावितो असे सांगितले. त्यावेळी इनोव्हा चालक अटक आरोपी दीप गायकवाड यांने सदर इनोव्हा गाडी यू टर्न करून पनवेलच्या दिशेने तोंड करून उभी केली. त्यानंतर थोड्याच वेळात अटक केलेले पोलीस अंमलदार समीर परशुराम म्हात्रे व विकी सुभाष साबळे हे गणवेशात मोटारसायकल वरून त्याठिकाणी आले. त्यावेळी गाडीत बसलेला अटक आरोपी समाधान पिंजारी यांने फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना पोलीस आले आहेत.गाडीच्या खाली उतरा असे सांगितले त्यावरून फिर्यादी व त्यांचे सहकारी पैशांच्या बॅगा गाडीतच ठेवुन खाली उतरले. त्याचवेळी सदर पोलीस अंमलदार उभ्या असलेल्या इनोव्हा जवळ जावुन, “इथे काय करत आहात. इथे मर्डर होतात” असे बोलून फिर्यादी व त्यांचे सहकारी यांची अंगझडती घेवु लागले. वर त्यांना गाडीमध्ये कोण आहे, गाडी चेक करावी लागेल असे बोलुन गाडीजवळ गेले त्याचवेळी अटक आरोपी दीप याने तात्काळ गाडी चालु करून सुसाट वेगाने पनवेलच्या दिशेने पैशासह गाडी घेवुन निघुन गेला.त्यानंतर तेथे आलेल्या पोलीस अंमलदारानी गाडीचा पाठलाग करून पकडतो.

व त्यांना घेवुन येतो असे सांगुन निघुन गेले. त्यानंतर फिर्यादी व सहकारी हे रोडने पायी पोयनाडकडे जात असताना गाडीचा पाठलाग करत गेलेले पोलीस अंमलदार पोयनाडकडुन अलिबागच्या दिशेने येताना दिसले. सदर अंमलदारानी फिर्यादीना पाहील्यानंतर रोड सोडुन कच्च्या रस्त्याने जंगलात निघुन गेले.या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला. बनावट तपासणी करणारे दोघे पोलीस – समीर म्हात्रे आणि विकी साबळे हेही या कटात सामील असल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादींना पोलिसी धाक दाखवून गाडीतून बाहेर काढण्याची आणि नंतर आरोपींना पैसे पळवून नेण्याची संपूर्ण योजना आखण्यात आली होती.५ फेब्रुवारी रोजी पोलिस हवालदार हनुमंत सूर्यवंशी याने फिर्यादींना २ कोटी रुपये घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात येण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादींनी ७ फेब्रुवारी रोजी रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली.पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकांनी वेगाने तपास करून समाधान पिंजारी आणि दीप गायकवाड यांना ८ फेब्रुवारी रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर, पोलिसांनी या कटात सामील असलेल्या समीर म्हात्रे आणि विकी साबळे या दोन पोलीस अंमलदारांना अटक केली. तर समाधान पिंजारी याचा भाऊ विशाल पिंजारी व इनोव्हा चालक (एम एच 01EA 1126) अक्षय खोत (दोघेही राहणार आटपाडी, सांगली) यांच्याकडून दीड कोटी रुपयांची रक्कम गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज जप्त केले असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.