धुळ्यात भरधाव वेगात असलेल्या वाहतूक करणाऱ्या डंपरने एक दुचाकीला जोरदार धडक दिली. इतकंच नाही तर या डंपरने मजुरांना दुचाकीसह फरफटत नेलं. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.धुळे तालुक्यातील वरखेडी-आर्णी रस्त्यावर वरखेडी शिवारात भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामासाठी वापरला जाणारा डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका टाइल्स फिटिंग मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.










