नंदुरबार : येथील भोणे फाट्याजवळ प्रभू विश्वकर्मा भगवान यांच्या मंदिरात सुतार समाज मंडळातर्फे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रभू विश्वकर्मा भगवान यांच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आले. सत्यनारायणाची पूजा, महाआरती करण्यात आली व दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले होते. यावेळीसमाजाचे वाल्मीक जगताप, आत्माराम मिस्तरी, हिरालाल गवळे, अमित देवरे, महेंद्र हिरे, दीपक जाधव, सूर्यकांत खैरनार, नामदेव सूर्यवंशी, मुकेश सूर्यवंशी, हर्षल खैरनार, युवराज कुवर, शिवाजी कुंवर, पुष्कर सूर्यवंशी, वसंत बोरसे, चेतन सोनवणे, मनोज सूर्यवंशी, मनोहर जगताप, रवींद्र बोरसे, सुभाष सूर्यवंशी, प्रकाश बोरसे, कन्हैया जगताप, दिनेश खैरनार, प्रकाश सूर्यवंशी, दौलत सूर्यवंशी , सुरेश सुतार व समाज बांधव उपस्थित होते









