एका चहाच्या कपात माशी पडलेली रुपेश सकपाळ यांना दिसली. त्यांनी ती बाब हॉटेल मालक तथा आरोपि क्रमांक १ तनवीर करामत शेख यांच्या निदर्शनाला आणली आणि चहा बदलून देण्यास सांगितले. पण चहा बदलून मिळाला नाही, त्यावेळी त्या चहाचे पैसे देणार नाही असे श्री. सपकाळ यांनी सांगताच तन्वीर शेख याला त्याचा राग येऊन त्याने आपल्या साथीदारांसह बेकायदा जमाव करून, रुपेश बबन सपकाळ यांना दोरीने बांधून काठीने व हाताच्या ठोशांनी मारहाण केली.सिंधुदुर्गात धक्कादायक प्रकार घडला आहे. चहात माशी पडल्याचे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून झाराप येथे पुण्यातील पाच ते सहा पर्यटकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना काल सायंकाळी झिरो पॉईंट परिसरात घडली. या प्रकरणी सहा जणांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










