चुकून गोळी सुटली, दोघांचा मृत्यू; मित्राने एकावर अंत्यविधी उरकले, दुसऱ्याला पालघरच्या जंगलात गाडलं.

या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही ही माहिती शिकाऱ्यांकडून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यातही मृतांपैकी एकावर अग्निसंस्कार करण्यात आले. दुसऱ्याचा मृतदेह जंगलात गाडला होता.पालघर तालुक्यातील जंगलपट्टी भागात रानडुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. झुडपातून डुक्कर किंवा अन्य प्राणी आल्याचे समजून एका सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा उलटल्यानंतरही ही माहिती शिकाऱ्यांकडून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यातही मृतांपैकी एकावर अग्निसंस्कार करण्यात आले. दुसऱ्याचा मृतदेह जंगलात गाडला होता. हा मृतदेह हाती लागला आहे.

जंगलपट्टीमधील बोरशेती, रावते, किराट, आकलोली या गावांतील दहा ते बारा जण २८ जानेवारी रोजी रानडुकराच्या शिकारीसाठी जंगलात गेले होते. शिकार झाल्यानंतर तिथेच जेवण करायचे ठरवून त्याकरता भांडीकुंडी व अन्य साहित्यही त्यांनी सोबत नेले होते. अमावास्येच्या रात्री बोरशेतीच्या जंगलात आंब्याचे पाणी या ठिकाणी रानडुक्कर तसेच पट्टेरी वाघ आणि विविध प्राणी पाणी पिण्यासाठी येत असल्याने या शिकाऱ्यांनी तिथे जाण्याचा बेत रचला. गावठी कट्टे तसेच गावठी ठासण्याची बंदूक घेऊन एक-एक जण ठरलेल्या ठिकाणी पोहोचला.मध्यरात्रीच्या सुमारास शिकाऱ्यांना आवाज आला. एखादा प्राणी आल्याचे समजून एकाने गावठी कट्ट्यातून आवाजाच्या दिशेने गोळी झाडली. त्यात रमेश वरठा (६०, रा. बोरशेती) यांचा जागीच मृत्यू झाला. ही गोळी रमेश यांना छेदून महालोड नावाच्या एका सहकाऱ्याच्या पायावर लागली. या अनपेक्षित घटनेमुळे सर्व जण प्रचंड घाबरले आणि त्यांनी वरठा यांचा मृतदेह जंगलातच गाडला. अन्य चौघांनी महालोडा याला त्याच्या घरी नेले. तिथे त्याच्यावर गावठी उपचार करण्यात येत होते. मात्र ३१ जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाला.\या घटनेबाबत स्थानिकांनी ४ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून मनोर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केल्यानंतर रमेश वरठा यांचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.