शहनाज अख्तर यांच्या भजनांचा पारोळेकरांना लळा!

मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले.आज वाढदिवसाच्या औचित्याने मित्र परिवाराच्या वतीने पारोळा शहरातील एन्.ई.एस.हायस्कुल पटांगण येथे मुस्लिम परिवारात जन्मलेल्या आणि सुप्रसिध्द भजन गायिका असलेल्या शहनाजजी अख्तर यांचा हिंदुत्ववादी गीत गायणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारोळेकरांना आपल्या विविध भजनांचा अक्षरक्षा ‘लळा’ लावला. एकाहून सरस भक्तीगीतांची संहिताच हा कार्यक्रम ठरला. मुस्लिम गायिकेने आपल्या सुमधूर आवाजाने गीतं सादर केली त्यावेळी पटांगणावरील अनेक हिंदू बांधव, माता-भगिणींनी नृत्याचा ठेका धरला.

जबलपूर येथील प्रसिध्द भजन गायिका आणि मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांच्या ‘भगवा रंग’ ही भजन संध्येचे गुरूवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले.पारोळा शहरातील एन्.ई.एस. हायस्कुल पटांगणावर ही भजन संध्या पार पडली. ‘माता है गौरा…पिता है महेश…जय हो गणेश तेरी जय हो गणेश’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ‘भोले हो गये टनाटन’, ‘मेरे भोले से भोले बाबा’, ‘जब श्याम मेरे सपनों मे आये’ ‘आगे बजरंगी’ अशी विविध भजनं शहनाज अख्तर यांनी गायिली. ‘मुझे चढ गया भगवा रंग’ या गीताने या कार्यक्रमाचा शेवट झाला.जय श्रीरामाचा जयघोष! मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले. सुमधूर आवाजात हिंदू देवी-देवतांची भजनं गातानाच, आपण मंदिरातही जातो. मंदिरात जाण्यात आपल्याला कोणतेही वावडे नसल्याचे सांगतानाच, आपली लोकप्रियता ही देवीचा आशीर्वाद असल्याचीही कबुली त्यांनी यावेळी दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.