म्हसावद येथील माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला प्रसंगी वक्ते सतिष शिंदे यांचे शैक्षणिक प्रबोधन पर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकजराव भिकनराव साळुंखे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मान्यवर म्हणून वक्ते सतिष शिंदे यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण आपल्या यशाच्या शिखर गाठण्यासाठी यथोचित प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन यावेळेस केले. तसेच ऐतिहासिक व वैज्ञानिक उदाहरण दाखले देत विद्यार्थ्यांनी उपाययोजना कशी करावी यावर मार्गदर्शन केले.









